• एसएमएस द्वारे तक्रार करा
    ७७३८१३३१३३ , ७७३८१४४१४४
  • वाहतूक व्हाट्सऍप हेल्पलाइन
    ८४५४९९९९९९
  • ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन
    १०९०
  • पोलीस नियंत्रण कक्ष
    १०० , ११२
  • महिला हेल्पलाईन
    १०३
  • सायबर हेल्पलाईन
    २६५०४००८ , १९३०
slider-img
slider-img
slider-img
slider-img
slider-img
slider-img
बातम्या


पोलीस आयुक्तांच्या लेखणीतून


श्री. देवेन भारती, भा.पो.से., पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई.

मुंबई आहे स्वप्नांचे शहर. सतत कामात असणारे ऊर्जावान महानगर! कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जाणारे हे एक अद्वितीय महानगर आहे. मुंबई पोलीस या शहराची ही संस्कृती कायम राखतील आणि त्यासाठी सतत कार्यरत राहतील. मुंबईत कायमच कायद्याचे राज्य राखताना प्रामाणिकपणे न्याय व्हावा, प्रत्येक नागरिकाला या महानगरात सुरक्षित वाटावे, सन्मानाने जगता यावे आणि त्याच्या भावनांची दखल घेतली जावी, यासाठी काम करणे ही मुंबई पोलीस आपली जबाबदारी मानतात.

सर्व समाजात एकोपा नांदावा, समाजात शांतता असावी आणि गुन्हेगारीला पायबंद बसावा; यासाठी मुंबई पोलीस दल प्रयत्नांची पराकाष्ठा करीत राहील. नागरिकांचे जीवन सुखरूप आणि सुरळीत असावे, याकरिता रस्ते वाहतूक नियंत्रित करण्यापासून ते संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यापर्यंत आणि नव्याने उभी राहणारी आव्हाने पेलण्यापर्यंत सर्व बाजूंनी पोलीस दल सतत दक्ष राहून कर्तव्य बजावत राहील.

सुरक्षा ही केवळ आमची जबाबदारीच नाही; तर हे आम्ही दिलेले वचन आहे.
मुंबई पोलीस सदैव तुमच्यासोबत आहेत आणि कायमच तुमच्यासाठी आहेत!

देवेन भारती, भा.पो.से.,
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई.

उपक्रम


initiativesimg

१९३० सायबर हेल्पलाईन, गुन्हे शाखा, मुंबई

सायबर गुन्हेजागृती बरोबरच बृहन्मुंबई शहरातील नागरिकांना सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदवणे सोपे व्हावे तसेच सायबर फसवणुक झालेल्या प्रकरणांमध्ये नागरिकांना तात्काळ प्रतिसाद देऊन फसवणुक झालेली रक्कम गोठण्याकरिता गृहमंत्रालयामार्फत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) शी संलग्न १९३० सायबर हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे.

...अधिक वाचा

विद्यार्थ्यांमध्ये नशामुक्तीबद्दल जागरूकता!

मुंबई उत्तर विभाग-३ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांच्या वतीने मुंबईतील २१ शाळांमध्ये अंमली पदार्थांच्या गैरवापराबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे शरीर व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या उपक्रमातून एकूण १,६६१ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अंमली पदार्थांच्या प्रभावाला बळी न पडता योग्य व निरोगी जीवनशैलीची निवड करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. जागरूक विद्यार्थी, सक्षम समाज आणि नशामुक्त मुंबईच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल!

...अधिक वाचा

विद्यार्थ्यांसाठी सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मध्य विभाग सायबर पोलीस ठाण्यातर्फे एस.एस.एल. सीबीएसई शाळेत विद्यार्थ्यांसाठी सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ऑनलाइन सुरक्षितता, समाजमाध्यमे, कृत्रिम बुद्धिमत्ता साधने, सायबर फसवणूक तसेच जबाबदार डिजिटल वापराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

...अधिक वाचा

गुंतवणुकदारची बैठक

गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्यासाठी सर जे जे मार्ग पोलीस ठाणे वपोनि यांच्या आॅफीस मध्ये गुंतवण्ुकीदारची मीटीग घेण्यात आली.गंुतवणूकदार उद्योजकांच्या अडचणींचे निराकरण करण्यात आले.

...अधिक वाचा