दंगल नियंत्रण पोलीस

About Us


दंगल नियंत्रण पोलीस (आरसीपी) हे विशेषतः प्रशिक्षित पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक आहे. हे विशेष बल व्यावसायिक मार्गाने कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे आणि दंगलसदृश परिस्थिती कुशलतेने त्याचा सामना करण्यास सक्षम आहे, हे पथक मुंबई पोलीसांच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे.

दंगल नियंत्रण पोलीस पथकात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करण्यास सक्षम असे तरुण, कणखर आणि प्रशिक्षित पोलीस अधिकारी आणि अंमलदार कार्यरत आहेत. ते जमाव पांगवण्यात प्रशिक्षित असून या कारवाईकरिता लागणारी सर्व अत्यावश्यक उपकरणे त्यांना पुरविण्यात आलेली आहेत. त्यांना प्रथमोपचार करण्याचे देखील प्रशिक्षिण देण्यात आलेले आहे.

कोणत्याही विद्रोहास किंवा बंडाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आरसीपीच्या प्रत्येक कंपनीकडून एका प्लॅटुनला प्रतिबंधात्मक रणनीतीचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना "जलद प्रतिक्रिया पथक" (QRT) म्हणून विकसित केले गेले आहे.