संरक्षण व सुरक्षा

About Us


संरक्षण व सुरक्षा विभाग यापुर्वी अप्पर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, गु.अ.वि., मुंबई यांचे अधिपत्याखाली कार्यरत होता. विद्यमान स्वतंत्र संरक्षण आणि सुरक्षा शाखा १९९९ मध्ये अस्तित्वात आले. महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक Home Dept. No. IPS-1798/C.No.433/ Pole No-1, Dated 19/03/1999 अन्वये पोलीस उप आयुक्त (सुरक्षा), विशेष शाखा-१, गु.अ.वि., या पदाची सध्याचे अप्पर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा या पदावर श्रेणीवाढ करून सध्याचा संरक्षण व सुरक्षा विभाग सन १९९९ साली कार्यरत झाला. 

संरक्षण व सुरक्षा विभाग प्रशिक्षित कर्मचारी संगठण असून मुंबईस्थित व मुंबई बाहेरील महत्वाच्या व अतिमहत्वाच्या विविध स्तरातील (खाजगी/राजकीय/सामाजिक) संरक्षित व्यक्तींचे (वर्गीकृत/अवर्गीकृत) संरक्षण तसेच महत्वाची/संवेदनशील मर्मस्थळे व आस्थापनांच्या सुरक्षा व्यवस्थेचे काम पहिले जाते. 

अप्पर पोलीस आयुक्त, (संरक्षण व सुरक्षा) यांचे अखत्यारीतील पोलीस उप आयुक्त (संरक्षण), पोलीस उप आयुक्त (सुरक्षा), पोलीस उप आयुक्त(मंत्रालय सुरक्षा) या विभागांचे कामकाज चालते. याव्यतिरिक्त पोलीस उप आयुक्त (जलद प्रतिसाद पथक) यांचे अभियान व प्रशिक्षण व सागरी सुरक्षा विभागाच्या कामकाजावर देखरेख अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. 

संरक्षण शाखांतंर्गत संरक्षण शाखा १,२ व ४ यांचेकडुन अवर्गीकृत संरक्षित व्यक्तींना लगतचे संरक्षण पुरविले जाते. याव्यतिरिक्त मा. राजपाल यांचे निवासस्थान (राजभवन), मा. मुख्यमंत्री यांचे निवासस्थान (वर्षा बंगला) तसेच मातोश्री बंगला या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था पहिली जाते. 

मुंबईस्थित महत्वाची मर्मस्थळे, आस्थापना तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या मुंबई भेटी दरम्यानच्या ठिकाणांची संरक्षण शाखांतर्गत तांत्रिक शाखा, बी. डी. डी. एस. व श्वानपथक यांचेकडुन घातपात विरोधी तपासणी संयुक्तपणे करण्यात येत असते. 

सुरक्षा शाखेकडुन अभिलेखावरील महत्वाची वर्गीकृत/अवर्गीकृत मर्मस्थळे, आस्थापना, स्थळे, मॉल्स/मल्टिप्लेक्स व परदेशी वकालती यांचा सुरक्षा आढावा घेतला जातो. मुंबईस्थित परदेशी वकिलातींचे महावाणिज्य दूत यांना अंगसंरक्षक तसेच आस्थापनांच्या ठिकाणी नेमले जातात. 

मंत्रालय मुख्य इमारत, जोड इमारत, नवीन प्रशासकीय इमारत व सह्याद्री गेस्ट हाऊस या आस्थापनांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पोलीस उप आयुक्त (मंत्रालय सुरक्षा) यांचेकडुन पहिली जाते.