महिला अत्याचार विरोधी कक्ष

About Us


पोउआ (महिला अत्याचार प्रतिबंधक शाखा) हे महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेचे प्रभारी असतात. त्यांचेअंतर्गत कक्ष १, कक्ष २ आणि महिला सहाय्य कक्ष यांचा समावेश होतो.

कक्ष १ -

बलात्कार, अपहरण, विनयभंगाचे प्रकार आणि महिलांवरिल इतर गंभीर गुन्ह्यांचा तपास तसेच सदरबाबत प्राप्त तक्रार अर्जाची चौकशी आणि निपटारा करणे.

 कक्ष २ -

हुंडाबळी, हुंड्याच्या संबंधित आत्महत्या आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत उद्धवणारे इतर गुन्हे, भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ (अ) अंतर्गतचे गुन्हे तसेच कौटुंबिक हिंसाचार व हुंड्याशी निगडित इतर गुन्ह्यांचा तपास तसेच सदरबाबत प्राप्त तक्रार अर्जाची चौकशी आणि निपटारा करणे.

महिला सहाय्य कक्ष

नमूद कक्षामध्ये पती-पत्नी यांच्यातील कौटुंबिक वाद किंवा कलह संदर्भात प्राप्त तक्रार अर्जाच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यात येते.