सायबर गुन्हे

About Us


       

   पोउआ (सायबर गुन्हे) हे सायबर गुन्हे शाखेचे प्रभारी आहेत. सायबर पोलीस ठाणे हे त्यांचे देखरेखीखाली काम करते. ०९ एप्रिल, २००९ रोजी सायबर पोलीस ठाणे कार्यरत झाले. ही शाखा वेबसाइट हॅकिंग, सायबर स्कॉकिंग, सायबर पोर्नोग्राफी ( बीभत्स साहित्य ), ई-मेल, क्रेडिट कार्ड गुन्हा, सॉफ्टवेअर चोरी, ऑनलाइन फसवणूक आणि इंटरनेट गुन्हा तपासणीशी संबंधित असून भा.द.वि. आणि इतर कायद्यांसह, विशेषत: माहिती तंत्रज्ञान कायदा (दुरुस्ती) २००८ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या प्रकरणांशी तपास करतात.

सायबर पोलीस ठाणेची भूमिका / जबाबदारी :

१. सायबर गुन्हे अन्वेषण यंत्रणेतील मुंबई पोलीस कर्मचार्यांना नियमित प्रशिक्षण देणे. 

२. शाळा, महाविद्यालये आणि संस्था / संघटनांमध्ये सायबर गुन्हे प्रतिबंध / जागरुकता कार्यक्रमांचे आयोजन / व्यवस्था करणे. 

३. सायबर पोलीस ठाणे, मुंबई हे पोलिसांचे स्थानिक पोलीस ठाणे, गुन्हे शाखाचे कक्ष आणि इतर शाखांचे अधिकारी यांना तपासणीसाठी तांत्रिक सहाय्य देखील प्रदान करते. 

४. राज्य विरुद्ध प्रतिकूल टिप्पणी किंवा दुर्भावनायुक्त टिप्पणी आढळल्यास ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था समस्या उद्भवू शकतील, तेव्हा सायबर पोलीस ठाणे, मुंबई, हे संगणक आणीबाणी प्रतिसाद पथक, भारत (सीईआरटी-इन) यांना नोडल ऑफिसर हा द्वारे ( सह पोलीस आयुक्त, गुन्हे, मुंबई ) (कलम ६९ आयटी कायदा अंतर्गत ) किंवा संबंधित माननीय न्यायालयाचे आदेश प्राप्त करुन विनंती पाठवणे. न्यायालय अशा प्रकारच्या सामग्रीचे इलेक्ट्रॉनिक प्रसारण रोखेल जेव्हा वेबसाइट रजिस्ट्रार / सेवा प्रदाता हा ईमेलद्वारे केलेली विनंती स्वीकारणार नाही. 

५. बाल अश्लीलता ( पोर्नोग्राफी ) आणि बलात्कार, सामूहिक बलात्कार प्रकरणे यात सायबर पोलीस ठाणे, मुंबई ही मुंबई पोलिसांना नोडल म्हणून काम करते.