२४ X ७ सामाजिक माध्यमांद्वारे नागरिक सहाय्य    स्मार्टफोनच्या आगमनानंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर कनेक्ट व उपलब्ध असल्याने आम्हीसुध्दा सोशल मीडियावरील आमच्या उपस्थितीपासून दूर जाऊ शकत नाही. मुंबई पोलिसांची सोशल मीडियावरील सक्रिय उपस्थिती आणि विविध पोलीस संबंधित विषयांवर नागरिकांना मदत करणे. @MumbaiPolice twitter handle चे ४.६ दशलक्ष अनुयायींपेक्षा अधिक आहे आणि @CPMumbaiPolice twitter handle चे ३.२ दशलक्ष अनुयायी आहेत. नेटिझन्सच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये समर्पित सोशल मीडिया टीम २४x७ उपलब्ध आहे आणि सर्व शक्य मदत प्रदान करते.