जेष्ठांकरिता सहाय्यता क्रमांक



    एक सत्य सुटू शकत नाही की ज्येष्ठ नागरीकांना पूर्वीपेक्षा जास्त धोका आहे. वृद्धांची चिंताजनक अशी संख्या स्वतःवरच जगतात. त्यांच्या बेपर्वा कुटुंबियांनी त्यांच्याकडे दुर्लक्षीत केल्याने, ते आरोग्य समस्या आणि उदासीनता यामुळे पूर्णपणे असहाय्य व संकटात आहेत आणि गुन्हेगारी घटकांकरिता अत्यंत संवेदनशील झाले आहेत. परंतु आता त्यांना स्वतःचे एल्डर हेल्पलाइन नावाचे हजारो सदस्य असलेले कुटुंब पुन्हा नव्याने लाभणार आहे.
    मदतीचा हात
    आता ज्येष्ठ नागरिकांनी कोणतेही सहाय्य मिळण्यासाठी एल्डर हेल्पलाईन क्रमांक १०९० यावर संपर्क साधला पाहिजे. कोणत्याही वेळी ज्येष्ठ नागरिकांचे शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्याकरिता मुंबई पोलीसांनी एल्डर हेल्पलाइन ही एक विशेष सेवा सुरु केली आहे. मुंबई पोलीस हा अभिनव उपक्रम माध्यम भागीदार टाईम्स ऑफ इंडिया आणि तंत्रज्ञान भागीदार स्पॅनको टेलिसिस्टम्स आणि सोल्युशन्स यांच्या सहभागाने राबवित आहे. ज्येष्ठ नागरिक मदत केंद्र - मदतीचा हात.
    ज्येष्ठ नागरिक एल्डर हेल्पलाइन यावर संपर्क साधू शकतात.
    १. जेव्हा त्यांना तातडीने वैद्यकीय व्यावसायिकांच्या/डॉक्टरांची मदतीची आवश्यकता असते तेव्हा
    २. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते कि, ज्यामध्ये शारिरीक हिंसा असते किंवा त्यांच्या जिवीतास धोका निर्माण होतो तेव्हा
    ३. ज्येष्ठ नागरिक स्वतःच नोंदणी करण्यासाठी १०९० ला थेट फोन करू शकतात.
    त्यांना फक्त १०९० क्रमांकाच्या टोल फ्री नंबरवर कॉल करावा लागतो.
    संरक्षित साखळी
    एल्डर हेल्पलाइन हे एक अविस्मरणीय उपक्रम आहे जेथे मुंबई पोलिसांनी वृद्धांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक, डॉक्टर, दवाखाने, रुग्णालये, सल्लागार, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य नागरिक, पोलीस कर्मचारी आणि सर्वोत्तम तंत्रज्ञान एकत्र आणले आहे. निश्चितपणे कोणत्याही सक्षम आणि अनुकंपा व्यक्ती किंवा संस्था स्वयंसेवक होऊ शकतात. प्रत्येक स्वयंसेवकाची एक साधी मुलाखत घेतली जाईल आणि प्रत्येकाची पार्श्वभूमी तपासणी केली जाईल आणि त्यानंतर त्यांना एक विशेष ओळखपत्र दिले जाईल. स्वयंसेवकांना ते केव्हा उपलब्ध होतील त्याचा सोयीचा दिवस व वेळ ठरविण्याची परवानगी दिली जाईल आणि जरी ते एखाद्या विशिष्ट क्षणी व्यस्त असले तर, त्यांणी याबाबत एल्डर हेल्पलाइनला कळविले पाहिजे.
    मागील यंत्रणा
    एल्डर हेल्पलाइन ही प्रगत जीपीएस-आधारित ट्रॅकिंग आणि प्रेषण प्रणालीणे अद्यावत आहे. म्हणून एका व्यक्तीने १०९० या क्रमांकावर संपर्क साधताच त्याचे अचूक स्थान आमच्या स्क्रीनवर अचूकपणे दर्शविले जाते. त्याचप्रमाणे, आम्हाला योग्य स्वयंसेवकांचा मागोवा घेणे, त्यांच्याशी संपर्क साधणे आणि स्वयंसेवकांना किंवा जर गरज असेल तर पोलीस मोबाईल लगेच पाठवणे याकरिता मदत करते. एल्डर हेल्पलाइन मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांची माहिती संकलीत करते, जेणेकरून नेहमी मदतीसाठी असते. जर स्वयंसेवक उपलब्ध नसतील, तर पोलीस अधिकारी त्वरित पाठविले जातात. हे सर्व खात्रीशीरपणे आम्ही जलदगतीने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना उत्तमप्रकारे मदत करण्यासाठी आहे.