विद्यार्थ्यांमध्ये नशामुक्तीबद्दल जागरूकता!
मुंबई उत्तर विभाग-३ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांच्या वतीने मुंबईतील २१ शाळांमध्ये अंमली पदार्थांच्या गैरवापराबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे शरीर व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या उपक्रमातून एकूण १,६६१ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अंमली पदार्थांच्या प्रभावाला बळी न पडता योग्य व निरोगी जीवनशैलीची निवड करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. जागरूक विद्यार्थी, सक्षम समाज आणि नशामुक्त मुंबईच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल!
