सायबर जनजागृती
🚨 सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे मार्फत सायबर गुन्हे विषयक जनजागृती उपक्रमाबाबत 🚨 आदरणीय सर , जय हिंद आज दिनांक 21/01/2026 रोजी डॉ. प्रवीण मुंढे ,मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ 01, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या वतीने महाराष्ट्र स्टेट वुमन कौन्सिल, आशा सदन मुंबई येथील सभागृहामध्ये सायबर गुन्हे जनजागृती उपक्रम संपन्न झाला. सदर उपक्रमांतर्गत सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणेचे सायबर गुन्हे अन्वेषण अधिकारी पोउनि ओंकार काकडे व पोउनि प्रशांत आमुंडकर यांनी पो शि गरड सध्या चालू असलेले सायबर विषयक गुन्हे, त्यामधून होणारी आर्थिक फसवणुक आणि सदर सायबर गुन्ह्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय , सोशल मिडिया व त्याचा दैनंदिन जीवनातील वापर करताना घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच सायबर गुन्हे त्याचे प्रकार व त्यापासून बचाव करणेकरिता आवश्यक ते उपाय 1930,1945 हेल्पलाईन व सायबर दोस्त याविषयीचि माहिती पी.पी.टी सादरीकरणाद्वारे देण्यात आली. सदर कार्यक्रमास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मुंबई शोभा शेलार मॅडम, J.J.B बोर्ड च्या सदस्य ॲड. उर्मिला जाधव, ॲड. सविता, आशा सदनच्या मुख्य जयलक्ष्मी तसेच विविध NGO चे पदाधिकारी, व इतर असे 50 जण हजर होते. 📝 सविनय सादर ( रईस शेख ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर जे जे मार्ग पोलीस ठाणे, मुंबई
