सायबर गुन्हे जागरूकता कार्यक्रम आणि सायबर गुन्ह्या विरुद्ध लढा



    मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम शाखेचे प्रमुख पोलीस उप आयुक्त दर्जाच्या अधिकाऱयांकडे आहे. शहरातील वाढत्या तांत्रिक बाबींवर नियंत्रण राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यावर एक समर्पित सायबर विभाग स्थापित केला आहे. सदर शाखेमध्ये पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि दोन ते तीन अंमलदार असतील. मुंबई पोलिसांचे सायबर पोलीस स्टेशन, बीकेसी येथे २४X७ समर्पित सायबर हेल्पलाइन नंबर (९८२०८१०००७) आहे. विविध शाळा, महाविद्यालये, संस्था आणि संस्थांवर सायबर जागरूकता कार्यक्रम / व्याख्यान नियमितपणे आयोजित केले जातात. सायबर गुन्हेगारीवरील फलक आणि अनुबोधपट तयार करणे आणि सोशल मीडियावर प्रसारित केले जातात.