Safety Tips


Select Category to view Safety Tips


बँक व्यवहार करताना घ्यावयाची काळजी
  • आपल्या बँकेमध्ये खाते उघडण्याच्या वेळी कोणत्याही अज्ञात व्यक्तीचा परिचय करून देऊ नका अथवा जामीनदार राहू नका.
  • आपल्या खात्यामध्ये कधीही अज्ञात व्यक्तीचे चेक / ड्राफ्ट यांचा भरणा करू नका.
  • दीर्घ कालावधीसाठी आपले खाते निष्क्रीय ठेवू नका.
  • टपाल परिवहन किंवा कुरिअर सेवांमधील चोरी आणि नंतरची फसवणूक टाळण्यासाठी, पोस्ट आणि कूरियर सेवांद्वारे पाठविलेली चेक / ड्राफ्ट / पे ऑर्डर यांच्यावर पाळत ठेवा.
  • शक्यतो बँक व्यवहार स्वतः वैयक्तिकरित्या हाताळले पाहिजेत.
  • आपल्या चेक बुकची काळजी घ्या. सही केलेले चेक खुले ड्रावर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जिथे बाहेरील व्यक्तीस सुलभ प्रवेश मिळतो तेथे ठेवू नका
  • बँकेमध्ये जमा धनादेशांची पूर्तता केली गेली आहे, अथवा चेक वटले आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे. म्हणूनच सर्व बँक व्यवहारांची फेर तपासणी केली पाहिजे.
  • आपल्या बँक खात्याचे मासिक स्टेटमेंट नेहमी तपासावे. रोख रक्कम काढताना/भरताना तुम्ही रोखपाल खिडकीसामोरच रोख रक्कम तपासून घ्या. रोख रक्कम मोजणीसाठी त्रयस्थ व्यक्तीकडे देऊ नये.

चेक बाउन्स टाळण्याकरीता
  • आपण एखाद्या अज्ञात पक्षाशी व्यवहार करत असल्यास डिमांड ड्राफ्ट किंवा पे ऑर्डरद्वारे व्यवहार करण्याचा आग्रह करावा.
  • पोस्टडेटेड चेकने व्यवहार करणे टाळले पाहिजे-
  • जर चेक बाउन्स झाला असेल तर अशा व्यक्तीस १५ दिवसाच्या आत नोटीस द्यावी. जर नोटीसला उत्तर प्राप्त झाले नाही, तर नेगोसिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट, १९८१ च्या कलम १३८ अंतर्गत न्यायालयात तक्रार दाखल करा, जेथे सामान्य जनतेस प्रभावी उपाय उपलब्ध आहेत. भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत चेक बाऊंसचे सर्व प्रकारामध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंदविता येत नाही.