मिरवणूक / पदयात्रा परवानगी अर्ज


अटी व शर्ती

  • अर्जदारांनी मिरवणूक / पदयात्रेच्या नमूद दिनांकाच्या कमीत कमी 07 दिवस अगोदर अर्ज सादर करावा.
  • सदर परवानगी फक्त पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या अधिपत्याखालील बृहनमुंबई हद्दीपर्यतच देण्यात येत आहे.
  • मिरवणूक / पदयात्रा दिलेल्या मार्गावरूनच नियोजित वेळेत सुरू करून, नियोजित वेळेतच संपविण्याची जबाबदारी आयोजकांवर राहील.
  • मिरवणूक / पदयात्रा निघाल्यानंतर ती मार्गावर रेंगाळत ठेवू नये.
  • मिरवणूक / पदयात्रेच्या दरम्यान महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंध घालण्यात आलेल्या बाबीचे पालन करावे.
  • मिरवणूक / पदयात्रेमध्ये सहभागी होणाऱ्यांनी मिरवणूक / पदयात्रेच्या संपुर्ण कालावधीत इतरांच्या भावना दुखावतील अश्या कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह अथवा भावना भडकवणाऱ्या घोषणा देवू नयेत किंवा तसे फलक प्रदर्शित करू नयेत.
  • मिरवणूक / पदयात्रेच्या दरम्यान अश्लील हावभाव अंगविक्षेप करू नये अथवा पादचाऱ्यांना वाहनचालकांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये.
  • वाहतूकीस अडथळा निर्माण होवू नये म्हणून मिरवणूक / पदयात्रा ररत्याच्या एका बाजूने नेण्यात यावी व किमान दहा स्वयंसेवक वाहतूक नियमनाकरीता ठेवावेत व वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • मिरवणूक / पदयात्रा फूटपाथवरून नेऊ नये, तसेच मिरवणूक / पदयात्रा रस्त्यावर मध्येच थांबवू नये, बसवू नये किंवा फूटपाथवर थांबवू नये.
  • मिरवणूक / पदयात्रेच्या कालावधीत शस्त्र किंवा हत्यारे उदा. तलवार, लाठी इ. जवळ बाळगु नये.
  • मिरवणूक / पदयात्रेमध्ये घोडागाडी / बैलगाडी व इतर जनावरे वापरण्यास सक्त मनाई आहे.
  • मिरवणूक / पदयात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचा स्फोटक पदार्थाचा वापर, फटाक्यांची आतषबाजी करू नये.
  • मिरवणूक / पदयात्रा सुरू करण्यापुर्वी इतर विभागाशी संबधीत आवश्यक परवाने उदा. महापालिका परवानगी इ. अर्जदाराने संबधितांकडून परस्पर प्राप्त करून घ्यावेत.
  • पोलीसांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68 प्रमाणे सुचना देण्याचे अधिकार आहेत त्याप्रमाणे कर्तच्यावरील पोलीसांनी दिलेल्या सर्व सुचनांचे, आदेशांचे मिरवणूक / पदयात्रेतील सहभागी लोकांनी पालन करावे.
  • मिरवणूक / पदयात्रेकरीता वापरण्यात येणारे वाहन सुस्थितीत आहे, वाहन चालकांकडे उचित परवाना आहे. वाहन चालकाने मादक पदार्थाचे सेवन केले नाही तसेच करणार नाही, वाहन चालक पुर्ण वेळ वाहनासोबत राहील इ. बाबींची खातरजमा करावी व त्यांची पूर्तता करण्याची जबाबदारी सर्वस्वी आयोजकांची आहे.
  • मिरवणूक / पदयात्रेकरीता वापरण्यात येणाऱ्या वाहनासमोरील जागा, बॉनेट, छत, बंपर यावर कोणीही व्यक्ती, लहान मुले बसणार नाहीत तसेच बाजूच्या फूट रेस्ट यावर कोणीही लटकणार नाही, वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक बसणार नाहीत यांची दक्षता घ्यावी
  • मिरवणूक / पदयात्रेकरीता वापरण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये कोणताही ज्वालाग्राही पदार्थ ठेवण्यात येऊ नये.
  • मिरवणूक / पदयात्रेच्या दरम्यान न्यायालयीन बाब निर्माण झाल्यास हे कार्यालय प्रतिवादी राहणार नाही.
  • मिरवणूक / पदयात्रेच्या दरम्यान अपघात घडल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी आयोजकांची राहील
  • मुंबई पोलीस कायदा कलम 37(3) अन्वये तात्कालीन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहून मिरवणूक परवाना कोणत्याही वेळी रद्द करण्याचे अधिकार पोलीसांना आहेत यांची नोंद घ्यावी.