×

Our Mission


• मुंबई पोलीस कोणतेही भय न बाळगता या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहतील. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.

• आम्ही आमची सचोटी व एकनिष्ठता उच्चप्रतीची राखण्यासाठी, पोलीस दल भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी, सुनिश्चितपणे त्वरीत आणि सुखावह प्रतिसाद देण्यासाठी, आमचे व्यावसायिक कौशल्य वाढविण्यासाठी, कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी, आम्ही एक संघ राहून पोलीस दलाच्या हितासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू. तसेच समाजातील सर्वांचे विशेषतः गरीब आणि उपेक्षीत लोकांचे सरंक्षण करून त्यांना सेवा पुरवून, मुंबई शहर हे एक सुरक्षित आणि संरक्षित शहर बनविण्याकरिता आम्ही समुदायाचे सहभागाने कार्य करत राहू.

• मुंबई पोलीस हे त्यांचे ब्रीद वाक्य “सद् रक्षणाय खलनिग्रहणाय” याप्रमाणे खरोखरच कर्तव्य करीत आहेत. भूतकाळातील संपन्न वारसा आणि पोलीस दलाच्या पूर्ववर्तींनी तयार केलेली गौरवशाली प्रतिमा यांच्यासह एकविसाव्या शतकातील मेगापोलीसिंगच्या बहुतेक आव्हानांना तोंड देण्यासाठी मुंबई पोलीस दल संपूर्णपणे सज्ज आहेत. हा ऐतिहासिक वारसा आमची उत्कृष्टता टिकवून ठेवण्यासाठी आम्हाला प्रेरणादाई शक्ती देईल. आमचं नवीन वाक्यांश “ सदैव तत्पर, सदैव मदतीस ” हे आमच्या ध्येयास आणि वेळेनुसार सुसंगत आहे.