×

History


- १९८५

देवनार पोलीस ठाणे

देवनार पोलीस ठाण्याची स्थापना ०१/०५/१९८५ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - देवनार पोलिस स्टेशन, रा. तु. कदम मार्ग, गोवंडी, मुंबई-४३ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ३.५-४ लाख लोकसंख्या ५ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. हे पोलीस ठाणे ४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - गायकवाड नगर बिट चौकी, के.डी. जंक्शन बिट चौकी, लिबोनी बाग बिट चौकी, संभाजी नगर बिट चौकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात देवनार अग्निशमन दल, पंपिंग स्टेशन, देवनार पशुवधगृह चा समावेश होतो. देवनार महानगरपालिका प्रसूती रुग्णालय हे प्रमुख सार्वजनिक रुग्णालय म्हणून काम करते, तर या परिसरात ग्लेझी रुग्णालयासारखी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.

प्रवासासाठी गोवंडी रेल्वे स्टेशन हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. देवनार पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२५५६८६८२, २५५६३३८१, २५५०४२९२

मोबाईल क्रमांक - ८९७६९४७९६१