×

इतिहास


- १९४०

अंधेरी पोलीस ठाणे

अंधेरी पोलीस ठाण्याची स्थापना १९४० रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - अंधेरी रेल्वे स्टेशन (पूर्व), व्हर्टेक्स जंक्शन, सहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ६९ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ४८३००० लोकसंख्या ४ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. हे पोलीस ठाणे ४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - गुंदवली गावठाण बिट चौकी, साईवाडी बिट चौकी, मोगरापाडा बिट चौकी, चकला जे. बी. नगर बिट चौकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अंधेरी कोर्ट, बी.एम.सी., अंधेरी रेल्वे स्टेशन, आगरकर चौक बेस्ट बस टर्मिनल, मेट्रो रेल्वे चा समावेश होतो. या परिसरात स्नेहा नर्सिंग होम, जैन हॉस्पिटल, पटेल नर्सिंग होम, दुर्गा नर्सिंग होम, संजीवनी हॉस्पिटल, सिद्धी नर्सिंग होम, परवेश नर्सिंग होम, क्रिटिकेअर हॉस्पिटल, केअरवेल नर्सिंग होम, अमरदीप नर्सिंग होम, चिरंजीवी लिएल्ड केअर अँड नर्सिंग होम, रेनबो वुमन्स हॉस्पिटल, गोयल हॉस्पिटल, आनंद चिल्ड्रन नर्सिंग होम अशी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.

प्रवासासाठी अंधेरी रेल्वे स्टेशन आणि आगरकर बेस्ट बस टर्मिनल हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. अंधेरी पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२६८३१५६२, २६८४२५३८

मोबाईल क्रमांक - ८९७६९५२१४९