×

History


-

वरळी पोलीस ठाणे

वरळी पोलीस ठाणेची दिनांक ३१ जुलै १९६२ रोजी स्थापना झालेली आहे. दिनांक १५ ऑगस्ट १९७० पर्यंत हे पोलीस ठाणे हे वरळी बीडीडी चाळ क्र. ६९, भागोजी वाघमारे मार्ग, वरळी, मुंबर्इ येथील चार खोल्या मध्ये कार्यरत होते. त्यांनतर दिनांक १५ ऑगस्ट १९७० रोजीपासुन ते सन-१९९९ पर्यंत हे पोलीस ठाणे वरळी बी.डी.डी. चाळ. क्रं. ६६, भागोजी वाघमारे मार्ग, वरळी, मुंबर्इ येथे होते. त्या नंतर सन-१९९९ सालापासुन वरळी पोलीस ठाणे हे डॉ. ए.बी. रोड, डनलॉप कंपनी समोरील बरॅकमध्ये तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्यात आले होते.

वरळी पोलीस ठाणेचे सुसज्ज इमारतीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात चालु असलेले बरॅकमधील पोलीस ठाण्याचे कामकाज बंद करुन दिनांक १५ ऑगस्ट २००२ रोजीपासुन वरळी पोलीस ठाणे, डॉ.अे.बी रोड ,वरळी मुंबर्इ -३० या ठिकाणी नवीन बांधण्यात आलेल्या इमारतीत स्थापन झाले आहे.