×

History


- १९६८

वडाळा पोलीस ठाणे

वडाळा पोलीस ठाणे इमारतही दि.०१/०२/१९६८ साली मुंबई गोदी प्राधिकरण यांचेकडुन पोलीस दलास हस्तातरीत करण्यात आली. सदरची इमारतही मुंबई गोदी प्राधिकरण यांचेकडुन भाडेतत्वावर आहे.

वडाळा पोलीस ठाणेची स्थापना मुंबई गोदी प्राधिकरण यांचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वसाहती, गोदामे व मोकळया जागेवर ठेवण्यात आलेल्या मालाची तसेच हद्दीतील मोठया तेल कंपन्याच्या तेलाच्या साठयांची सुरक्षितता, कायदा व सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था राखणेकामी करण्यात आली आहे.

पोलीस ठाणे हद्दीतील जागा ही मुंबई गोदी प्राधिकरण, केंद्र शासनाची खार जमीन व काही प्रमाणात महानगर पालीका यामध्ये विभागली गेली आहे. पोलीस ठाणे हद्दीत मागील दोन दशकात मोठया प्रमाणात झोपडयांची झपाटयाने वाढ झाली असून त्यामध्ये मिश्र लोकवस्ती आहे.