×

History


- १९८७

पंतनगर पोलीस ठाणे

पंतनगर पोलीस ठाण्याची स्थापना २६ फेब्रुवारी १९८७ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - पंतनगर पोलीस वसाहत, इमारत क्र. ७२, तळ मजला, स्वामी समर्थ मार्ग, पंतनगर, घाटकोपर (पूर्व) येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ०७ लाख ७४ हजार लोकसंख्या ही ६.० चौ.किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. पंतनगर पोलीस ठाणे ०४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - गरोडिया पोलीस चैकी, निलयोग पोलीस चैकी, कामराज नगर पोलीस चैकी, माता रमाबाई पोलीस चैकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बृहन्मुंबई महानगर पालिका एन वाॅर्ड कार्यालय, डायरेक्टर ऑफ लाईट हाउस, निलयोग माॅल, ओडियन माॅल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, उदचंदन केंद्र/मलनिस्सारण केंद्र) झवेरबेन पोपटलाल सभागृह आणि विक्रांत सर्कल यांसारखी अनेक महत्त्वाची ठिकाणे यांचा समावेश होतो. मालती मॅटर्नींटी हाॅस्पीटल, कामदार नर्सींग होम आणि परख हाॅस्पीटल इत्यादी खासगी रुग्णालये येथे उपलब्ध आहेत. धर्मस्थळांमध्ये पिंपळेष्वर षिव मंदिर आणि श्री. स्वामी नारायण मंदिर हे महत्त्वाचे आहे.

प्रवासासाठी घाटकोपर रेल्वे स्थानक (पूर्व) आणि घाटकोपर बस डेपो हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. पंतनगर पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२६१८४३०८/२५६३६३६८/२१०२२९१४/२१०१९०८७

मोबाईल क्रमांक - ८९७६९४७९६५