×

Responsibilities


गुन्हयांस प्रतिबंध

  • गुन्हेगारांवर पाळत ठेवणे
  • नोंदीचे परीक्षण करणे
  • गस्त घालणे, मोबाईल व पायी गस्त घालणे, नाकाबंदी, कोंबिंग ऑपरेशन आणि छापे घालणे
  • मोहल्ला समिती माध्यमातून सूक्ष्म पातळीवर सहभागात्मक धोरण ( शेजाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची यंत्रणा ), स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग
  • फौजदारी प्रक्रिया संहिता, मुंबई पोलीस कायदा आणि इतर प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई, विशेष शाखेमार्फत अल्पवयीन गुन्हेगार व दुर्बल घटकावरील अत्याचारांवर विशेष काळजी घेतली जाते.

 

गुन्हयाचा शोध

  • गुन्हेगारांची चौकशी आणि फौजदारी खटला

 

सार्वजनिक सुव्यवस्था राखणे

  • सण, उत्सव, निवडणूक, सांप्रदायिक व सामाजिक तणाव, नैसर्गिक आपत्तीचे दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे.
  • अंतर्गत सुरक्षा राखणे : व्हिआयपी सुरक्षा आणि काउंटर हेरगिरी
  • विशेष गुन्हे : व्हाईट कॉलर गुन्हे, मादक पदार्थांचे सेवन, गँगस्टरद्वारे खंडणीची मागणी, शस्त्रास्त्रांच्या तस्करी वर नियंत्रण ठेवणे, टोळीच्या हालचालीं तपासणे
  • वाहतूक व्यवस्थापन: मुंबई जगातील सर्वाधिक दाट लोकवस्ती असलेले शहर आहे. विविध अडचणी असूनही मुंबई वाहतूक पोलीस आपल्या शास्त्रीय व कार्यक्षम वाहतूक व्यवस्थापनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. अधिकारी यांच्या प्रशिक्षणावर विशेष जोर देऊन वाहतूक व्यवस्थापन केले जाते. सार्वजनिक शिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणी यावर जोर देण्यात आला आहे. समाजातील उत्साही नागरिक ट्रॅफिक वॉर्ड्स म्हणून सामील होऊ शकतात. व्यावसायिक क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्था वाहतूक जागृतीकरीता अधिकार्यांना सहकार्य करण्यास नेहमी तयार असतात.
  • सन् १९५७ पासून 'रोड सेफ्टी पॅट्रोल' (आरएसपी) योजनेत मुलांना समावेश करून, त्यांना वाहतूक व्यवस्थापनातील आणि रस्ते सुरक्षेमध्ये प्रशिक्षण देऊऩ, उद्याचे नागरिक ही संकल्पना म्हणून सादर करणारे मुंबई शहर हे भारतातील पहिले शहर होते. जवळजवळ ५०० शाळांमधून ६७,००० हून अधिक मुलांना वार्षिक प्रशिक्षित केले जाते.

 

इतर

  • अदखलपात्र गुन्हा अपघाती मृत्यु, अपघाती आग इत्यादी, प्रकरणात चौकशी करणे.
  • हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेणे.
  • परदेशी नागरिकांची नोंदणी व त्या अनुषगांने चौकशी करणे.
  • कोषागार, कैदी, अल्पवयीन गुन्हेगार, पळून आलेल्या मुली यांना संरक्षणात ठेवणे.
  • चारित्र्य पडताळणी, पारपत्र देण्याकरीता व्यक्तीची पूर्वीच्या नोंद ठेवणे आणि शासकिय रोजगारीकरीता, घरगुती नोंकराना जेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हा श़स़्त्र परवाना व इतर परवाना देणे.
  • समाजातील दुर्बल घटकांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक कायदे अंमलबजावणी करून त्यांच्या सामाजिक स्थितीवर लक्ष ठेवणे मुंबई पोलीस कुंटुबांना विभाजीत होणेपासून आणि व्यसनाधीनांना सुधारणेकरीता मदत करण्याचा प्रयत्न करतात तसेच सामाजिक वर्चस्वास्थेचे उच्चाटन करण्यावर आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत परस्परांशी संवाद साधण्यावर लक्ष केंद्रित करतात.
  • मुंबई पोलीस पळून गेलेल्या मुलांना त्यांचे कुंटुबियाकडे सोपवणे तसेच निराधार महिलांना एक सभ्य जीवन जगण्यासाठी मदत करते आणि सामाजिक, कौटुबिंक, व्यक्तिगत विवादावर समुपदेशन करते.
  • सांप्रदायिक दंगली / नैसर्गिक आपत्ती यासह कोणत्याही सामाजिक गोंधळानंतरची परिस्थिती सामान्य करून, अन्न, वस्त्रे, औषधे, रक्त आणि अगदी पैशांचे सुद्दा संकलन करून पिडीतांना मदत व पुर्नवसन करण्यात मुंबई पोलीस सक्रिय सहभाग घेतात. मुंबई पोलीस हे व्यापक संघटनेच्या माध्यमातून आपल्या लोकांपर्यंत पोहोचून एड्सच्या जागरुकता आणण्याचे मोलाचे काम करीत आहेत. गरजूंना मदत करण्यासाठी रक्तदान शिबीरे नियमितपणे आयोजित करते.