उत्कृष्ट कामगिरी
०८-जुलै-२०२५
पोस्को गुन्हयातील आरोपीतास 24 तपासाच्या आत अटक
दाखल गुन्हयाचे गांभीर्य पाहता भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. सचिन कदम यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि अमित कदम, पोउनि बोरसे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी तात्काळ घटनास्थळी जावुन घटनास्थळ ते भारत माता सिग्नल, लालबाग बिट चौकी, अल्बर्ट चौक ते कॉटन ग्रीन स्टेशन ते शिवडी स्टेशन असे जवळपास 150 सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासुन संशयित आरोपीताचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाणेस आणुन अटक करण्यात आली. सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 4, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, भोईवाडा विभाग, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोईवाडा पोलीस ठाणे सचिन कदम व मा. पोलीस निरीक्षक(गुन्हे) नितीन महाडिक यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथक - स पो नि यशवंत चव्हाण, पो.उप.नि. अमित कदम पो.उप.नि. सचिन बोरसे पो. उप. नि. सलीम सय्यद पो. ह. संतोष खेडेकर, पो. ह. माळी पो. ह. प्रकाश साळुंखे, पो. ह. नितीन धंगेकर, पो. ह. शैलेश पवार, पो शि. प्रदीप राठोड, पो शि अविनाश सुतार पो शि हेमंत सुळे, पो शि जयदीप पाटील पो शि शंकर जोशी