उपक्रम
वृक्षारोपन कार्यक्रम
महाराष्ट्र शासन वन विभाग आयोजित अमृतवृक्ष आपल्या दारी या योजने अंतर्गत आज दिनांक २६/०७/२०२५ रोजी महर्षी दयानंद कनिष्ठ महाविद्यालय एन एस एस युनिट मुंबई आणि भोईवाडा पोलीस ठाणे,परेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आज पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सचिन कदम सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व या प्रसंगी त्यांनी मुलांना मार्गदर्शन दिले. एक पेड अपने माँ के नाम Plant 4Mother
बालस्नेही कक्ष
भयमुक्त संवादासाठी, सुरक्षित कवच! ऽ बाल न्याय मॉडेल नियम 2016 मधील नियम 8 तसेच राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार अत्याधुनिक, आकर्षक व बाल स्नेही कक्षाची स्थापना केलेली आहे. ऽ या कक्षात पिडीत बालक तसेच विधीसंघर्षग्रस्त बालकांची भयमुक्त व सुरक्षित वातावरणात मुलाखत घेता येईल. यासाठी सुशोभित फर्निचर, रंगीत भिंत्तीचित्रे व खेळणी यामुळे मुलांना घरगुती आणि विश्वासार्ह वातावरण मिळेल याची काळजी घेण्यात आली आहे. बालकांच्या संवेदनशीलतेची जाणीव ठेवून, त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. ऽ हा कक्ष बालकांच्या हिताप्रती पोलीसांच्या कटिबद्धतेची आणि पोलीसांच्या सामाजिक बांधिलकीची हमी आहे. या उपक्रमामुळे पोलीस व बालकांमध्ये विश्वासाचे आणि सौहार्दाचे संबंध अधिक दृढ होतील. ऽ भोईवाडा पोलीस ठाणे मध्ये सन 2024 साली एकुण 08 व सन 2025 साली 02 बालकांविरूध्दचे गुन्हे दाखल झालेले असून त्यातील पिडीत बालकांना तज्ञांकडून समुपदेषनकरण्यात आले आहे. सदर बालस्नेही कक्षामुळे यापुढे पिडीत बालकांना समुपदेषन करणे अधिक सोयीचे होणार आहे