History
- २००६
विनोबा भावे नगर पोलीस ठाणे
विनोबा भावे नगर पोलीस ठाणे नवनिर्मीत असुन कुर्ला पोलीस ठाणेचे विभाजन होवून दिनांक १८ डिसेंबर,२००६ रोजी कार्यान्वीत झालेले आहे. विनोबा भावे नगर पोलीस ठाणे हद्दीत पुर्वीच्या कुर्ला पोलीस ठाणेच्या ३ बीट आलेल्या आहेत. विनोबा भावे नगर पोलीस ठाणेच्या पश्चिमेस कुर्ला पोलीस ठाणे, पुर्वेस घाटकोपर पोलीस ठाणे, उत्तरेस साकीनाका पोलीस ठाणे व दक्षिणेस नेहरू नगर पोलीस ठाणे आहे.
विनोबा भावे नगर पोलीस ठाणे परिसरात मिश्रवस्ती असुन ६० ते ७० टक्के वस्ती ही मुस्लिम धर्माचे व ३० ते ४० टक्के वस्ती ही हिंन्दु धर्मिय व इतर धर्मिय आहेत. दिनांक १८/१२/२००६ रोजी मा. पोलीस आयुक्त बृहन्मुबई श्री. अनामी रॉय यांच्या शुभ हस्ते उद्घाटन होऊन पुर्वीचे कुर्ला पोलीस ठाणे बीट क्र. ३ मध्ये कार्यान्वीत करण्यात आले व त्याप्रमाणे कामकाज चालु झाले.