History
- २००५
चारकोप पोलीस ठाणे
चारकोप पोलीस ठाण्याची स्थापना ०९/१२/२००५ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - चारकोप पोलिस स्टेशन, प्लॉट क्रमांक ५०, आरडीपी ०१, नेताजी सुभाषचंद्र बोस रोड, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई - ४०००६७ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ५,९५,७३० लोकसंख्या ८.३ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. हे पोलीस ठाणे ४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - चारकोप गाव चौकी, साईधाम नगर चौकी, सह्याद्री नगर चौकी, भाबरेकर नगर चौकी.
मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चारकोप मार्केट, आय.एम.पी. जंक्शन, मेट्रो कारशेड, महानगर टेलिफोन एक्सचेंज, अदानी वीज केंद्र, मेट्रो रेल्वे चा समावेश होतो. तर बी.एम.सी. प्रसूती रुग्णालय हे एक महत्त्वाचे सार्वजनिक रुग्णालय आहे, या परिसरात कीर्ती नर्सिंग होम, मंगलमूर्ती रुग्णालय, पार्वतीबाई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट, ऑस्कर हॉस्पिटल, आनंद नर्सिंग होम, आयुष नर्सिंग, आरोग्य केंद्र, अनुराग मॅटर्निटी हॉस्पिटल, सरस्वती हॉस्पिटल अशी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.
प्रवासासाठी कांदिवली रेल्वे स्टेशन आणि प्रबोधनकार ठाकरे बस स्थानक हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. चारकोप पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
दूरध्वनी क्रमांक - ०२२-२८६७६५८१
मोबाईल क्रमांक - ८५९१९३५८३१