×

Welfare Activities


पोलिस दीदी कार्यक्रम अंतर्गत संवाद

पोलिस दीदी कार्यक्रम अंतर्गत निर्भया पथक, स्वसंरक्षणाचे धडे इ. विषयी मनिलाल सुंदरजी मनपा स्कूल, जुहू,मुंबई येथे माहिती देऊन पोलिस दीदी कार्यक्रम अंतर्गत संवाद साधण्यात आला. 🔸महीलासंबंधी चें गुन्हे व मुलींच्या छेडछाडीचे गैरप्रकार या संबंधी माहिती व सुचना देण्यात आल्या. 🔸 काही चुकीचे होत असल्यास शिक्षकांना किंवा पालकांना सांगण्याबद्दल माहिती दिली. तसेच निर्भया पथकाचे संपर्क क्रमांक देऊन संपर्क करण्यास सांगितले. 🔸 शाळेच्या परिसरात बाहेरून येणाऱ्या व संशयित वाटणाऱ्या व्यक्तींबद्दल कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाता शिक्षकांना पोलिसांना माहिती देण्यास कळवले. 🔸 ऑनलाइन फ्रॉड/सायबर फ्रॉड बद्दल माहिती देण्यात आली. 🔸 शाळेमधील शिक्षकांना व मुलीना नव्याने लागू झालेल्या कायद्यांबाबत माहिती देऊन कायद्यामध्ये झालेल्या सुधारणा बाबत माहिती देण्यात आली