×

Media Coverage


Publish Date
News Title
Media Name
News

२२-मार्च-२०२५

"परिमंडळ-९ मधील पोलीस ठाणे अंतर्गत दाखल गुन्हयात हस्तगत केलेला मुद्देमाल मूळ मालक यांना वितरीत केल्याबाबत."

"परिमंडळ-९ मधील पोलीस ठाणे अंतर्गत दाखल गुन्हयात हस्तगत केलेला मुद्देमाल मूळ मालक यांना वितरीत केल्याबाबत." परिमंडळ-९ मधील पोलीस ठाणे अंतर्गत दाखल गुन्हयात हस्तगत करण्यात आलेली मुद्देमाल मूळ मालक यांना आज दिनांक २२/०३/२०२५ रोजी सकाळी १२.०० ते १४.०० वाजेपर्यंत वितरीत करण्याचा "भव्य समारंभाचे" आयोजन सेंट जोसेफ चर्च सभागृह, जुहू, विलेपार्ले (प), मुंबई येथे करण्यात आले. प्रस्तुत मुद्देमाल वितरण समारंभाचेवेळी खालील प्रमाणे मुद्देमाल मूळ मालक यांना वितरीत करण्यात आलेला आहे. सदर मुद्दे‌मालामध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन, सोन्याची दागिने, वाहने, मौल्यवान वस्तु, घडयाळे यांचा समावेश आहे. एकूण वितरीत मुद्देमाल संख्या १८४ एकूण मुद्देमाल किंमत रु. ३,०२,२५,७४७/- (तीन कोटी दोन लाख पंचवीस हजार सातशे सत्तेचाळीस) प्रस्तुत मुद्देमाल वितरण समारंभ मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मुंबई श्री. परमजितसिंह दहिया, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ९, मुंबई श्री. दिक्षीत गेडाम, परिमंडळ-९ मधील सर्व विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी यांचे उपस्थितीत यशस्वीरित्या पार पाडण्यात आला. सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त, मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (का व सु), मुंबई श्री. सत्य नारायण यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.