×

Media Coverage


Publish Date
News Title
Media Name
News

२३-ऑगस्ट-२०२५

नषामुक्त भारत

तंबाखू विरोधी व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान अंतर्गत, आज दि. 23/08/2025 रोजी लो.टि. मार्ग पोलीस ठाणे हद्दीत, चंदनवाडी म.न.पा. मराठी शाळा मुंबई येथे पहिली ते सातवी च्या वर्गामध्ये येथे दुपारी 14.30 वा. ते 15.10 वाजता च्या दरम्यान जनजागृती अभियान राबविण्यात आले. नमूद अभियानामध्ये शाळेचे तीन शिक्षक, 20 विद्यार्थी, विद्यार्थिनी हजर होते. सदर वेळी शिक्षकांना अंमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे शारीरिक, आर्थिक, मानसिक दुष्परिणामाबाबत बॅनर्स, पोस्टर्स प्रदर्शित करून , माहिती देण्यात येऊन, सदर अभियानास सहकार्य करण्याबाबत विनंती करण्यात आली. सदर वेळी सहा.पोलीस निरीक्षक व्ही. पाटील , महिला पोलीस उप निरीक्षक रुचिरा भाले उपस्थित होते. माहितीस्तव सविनय सादर,