History
- १९७६
एल . टि. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई
लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याची स्थापना १९७६ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्टेशन, आर.एस. सप्रे. मार्ग, मुंबई येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे २ लाख लोकसंख्या ६ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. हे पोलीस ठाणे ४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - मेघदूत फ्लाय ओव्हर बिट चौकी, जुम्मा मस्जिद बिट चौकी, वर्धमान चौक बिट चौकी, लोहारचाळ बिट चौकी.
मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पाठकवाडी इलेक्ट्रिक सेंटर, पाठकवाडी रिसीव्हिंग सेंटर, झावबावाडी रिसीव्हिंग सेंटर, मुंबा देवी मंदिर, जुम्मा मस्जिद, बडा कब्रस्तान, धनजी स्ट्रीट, भुलेश्वर मार्केट, मंगलदास मार्केट, एम.जे. मार्केट, काकड मार्केट, स्वदेशी मार्केट, लोहारचाळ, दवाबाजार, झवेरी बाजार चा समावेश होतो. या परिसरात सूर्यकांत वंगल हॉस्पिटल सारखी अनेक सरकारी रुग्णालये आहेत.
प्रवासासाठी मरीन लाइन्स रेल्वे स्टेशन हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
दूरध्वनी क्रमांक - ०२२-२२०६९२३०, २२०८०३०३, २२०८४३०२
मोबाईल क्रमांक - ८९७६९४७२०८