History
- १९५९
यलोगेट पोलीस ठाणे
बृहन्मुंबई शहराला एकूण ११४ किलोमिटरचा सागरी किनारा असून केंद्र सरकारच्या एसओपी अन्वये, भारताचे पश्चिमेकडील दिव दमण पर्यंत पसरलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी सीमेपर्यंत ( भूभागविरहीत १२ नोटिकल मैल अंतरापासून पूढे ३०० नोटिकल मैल ) समुद्रामध्ये घडलेल्या प्रत्येक दखलपात्र गुन्हयाची नोंद यलोगेट पोलीस ठाणेने घेणेबाबतचे निर्देष आहेत.
मुंबई लगतच्या समुद्र किना-याच्या पुर्वे कडील कुलाबा ते वाशी खाडी पर्यंत २४ किलोमिटरचा भाग गस्त व निगराणीसाठी यलोगेट पोलीस ठाणेच्या हद्दीत सामाविष्ठ आहे.यलोगेट पोलीस ठाणे सागरी हद्दीत ओएनजीसीचे निर्मनुष्य इन्स्टॅालेशन आहे, सागरामध्ये मासेमारी व्यवसाय चालतो. भाऊचा धक्का ते मोरा, उरण, अलीबाग व गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा, उरण अशी प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय चालतो.
अरबी समुद्रात गस्त घालणे, निगराणी, टेहळणी व गुप्त माहिती गोळा करून राष्ट्र विघाते कृत्य व कारवायांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधक कारवाई इत्यादी प्रयोजनांसाठी महाराष्ट्र शासन राजपत्र गृहविभाग, मंत्रालय क्र.टि.टि.सी. १०५८/गृह/९५९१६-६ दिनांक १७ ऑक्टोबर १९५९ अन्वये यलोगेट पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगराच्या समुद्र किनारपट्टी लगत असलेल्या पोलीस ठाण्यांनी किनारपट्टीपासून १२ नोटिकल मैला पर्यंत(ओहोटीच्या पाण्यापासून समुद्रात १२ नोटिकल मैल पर्यंत) घडणा-या सर्व बाबींची दखल संबंधीत पोलीस ठाण्यांनी घेणे आवश्यक आहे. त्याबाहेर काही घटना घडल्यास ३०० नोटिकल मैलापर्यंत (ओएनजीसी इन्स्टॅालेशनसह) यलोगेट पोलीस ठाण्याने कारवाई करावी अशी शासन आदेश आहेत. केंद्र सरकारच्या सागरी सुरक्षा २००५ अन्वये ठेवण्यात आलेल्या एस.ओ.पी. अन्वये यलोगेट पोलीस ठाणेची हद्द भारताचे पश्चिमेकडील गुजरात राज्याचे समुद्र किना-यापासून ते कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी सीमेपर्यंत असल्याने घडलेल्या प्रत्येक घटना व दखलपात्र गुन्हयाची नोंद यलोगेट पोलीस ठाणेने घेणे बाबतची होती.