×

History


- १९९५

मलबार हिल पोलीस ठाणे

मलबार हिल पोलीस ठाणे हददीत मा.राज्यपाल यांचे निवासस्थान व कार्यालय (राजभवन), मा.मुख्यमंत्री व इतर महत्त्वाची निवासस्थाने, तसेच परदेशी वाणिज्य दूतावास कार्यालये व त्यांची निवासस्थाने आहेत. मलबार हिल पोलीस ठाणेचे एकुण क्षेत्रफळ ०६ चौरस किमी इतके असुन लोकसंख्या ०१,४६,३०० इतकी असुन हा प्रदेश उतुंग इमारती व वृक्षराजांनी नटलेला आहे. पोलीस ठाणे हददीत प्रसिध्द बाणगंगा तलाव, पुरातन जैन मंदिर, चर्च, पारसी अग्यारी, पुरातन हिंदु मंदिरे, तसेच एक मशिद आहे. पोलीस ठाणे हददीत एक हिंदु स्मशानभुमी तसेच एक पारशी स्मशानभुमी आहे. तसेच फिरोजशहा मेहता उद्यानाच्या खाली ब्रिटीश काळातील पाण्याचा साठा करणारी टाकी आहे. त्यावर सुंदर उद्यानाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या जलाशयामधुन दक्षिण मुंबईत पाणी पुरवठा केला जातो.