History
- १८१७
गावदेवी पोलीस ठाणे
सन १८१७ साली गांवदेवी पोलीस ठाणेची स्थापना पंडीता रमाबाई मार्ग, नाना चौक, गांवदेवी, मुंबई येथे करण्यात आली. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट क्र. १) बॅन्ड स्टॅन्ड पोलीस चौकी बीट २) ग्रॅन्ट रोड रेल्वे स्टेशन पोलीस चौकी बीट ३) टाटा गार्डन पोलीस चौकी बीट व ४) अल्टा माऊन्ट रोड ह्या एकूण ४ बिट आहेत.
गावदेवी पोलीस ठाणे हद्दीत ०१ ) बॅन्डस्टॅड ०२ ) श्री महालक्ष्मी मंदिर ०३ ) टाटा गार्डन इ. समुद्र किनारे/चौपाटया आहेत. तसेच ०१ ) इराक वकालत, ०२ ) इराण वकालत, ०३ ) इंडोनेशिया वकालत, ०४ ) साऊथ आफ्रिका वकालत, ०५ ) जपान वकालत इ. अतिमहत्वाची दुतावास कार्यालये आहेत.
तसेच गावदेवी पोलीस ठाणे हद्दीत जसलोक हॉस्पीटल, पेडर रोड, मुंबई; ब्रिच कॅंडी हॉस्पीटल, खंबाला हिल हॉस्पीटल, मोतीबेन दळवी हॉस्पीटल, अजिंक्य हॉस्पीटल, पारशी हॉस्पीटल, डिसा हॉस्पीटल, पुरंदरे हॉस्पीटल, बाबुलनाथ हॉस्पीटल, बॉंम्बे आय क्लिनीक इ. रुग्णालये आहेत.
तसेच गांवदेवी टेलिफोन एक्सचेंज, नाना चौक, गावदेवी, मुंबई; गोवालिया टॅंक फायर स्टेशन, नाना चौक, मुंबई; केम्प्स कॉर्नर फ्लाय ओव्हर ब्रिज, केम्प्स कॉर्नर, मुंबई; टेलिफोन एक्सचेंज, खंबाला हिल एक्सचेंज, पेडर रोड, मुंबई; ‘‘डी’’ विभाग, मनपा, कार्यालय, जोबन पुत्रा कपाउंड, नाना चौक, मुंबई; शिधावाटप कार्यालय, महालक्ष्मी चेंबर, पहिला माळा, बिडी रोड, मुंबई; आयकर कार्यालय, आयकर भवन, पहिला व दुसरा माळा, माता मंदिर बिंल्डीग, पाटील इस्टेट, ताडदेव रोड, मुंबई; सेंट्रल एक्साईज मेहर, मेहर बिंल्डीग, तळमजला, पहिली दादी शेठ लेन, बाबुलनाथ, मुंबई; एन.आय.ए. नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजेन्सी; वामाळा कंबाला हिल टेलिफोन बिंल्डीग, पेडर रोड, मुंबई ही शासकीय/निमशासकीय कार्यालये आहेत.