×

History


- १९२३

डोंगरी पोलीस ठाणे

दक्षिण मुंबईतील मुंबई पोलीस दलाचे अधिपत्याखालील डोंगरी पोलीस ठाणे हे एक महत्वाचे पोलीस ठाणे आहे. सन १९२३ साली डोंगरी पोलीस ठाणेची स्थापना डॉ. मशैरी रोड, डोंगरी, मुंबई येथे झालेली आहे. डोंगरी पोलीस ठाणेच्या हद्दीत मिश्र स्वरूपाची लोकसंख्या आहे. बहुसंख्य लोकसंख्या ही मुस्लिम असल्याने सदरचे पोलीस ठाणे हे संवेदनशील पोलीस ठाणे म्हणुन ओळखले जाते. मुस्लिम समुदायाचे बरेचसे कार्यक्रम हे पोलीस ठाणे हद्दीत साजरे केले जातात.

सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाडीबंदर पोलीस चौकी, चारनळ पोलीस चौकी, खडक पोलीस चौकी व विठ्ठल मंदीर पोलीस चौकी अश्या एकूण ४ बिट आहेत. तसेच बाल सुधारगृह (चिल्ड्रनरूम) , जेल रोड, डोंगरी, मुंबई ( मुले व मुलींकरिता ), आशा सदन शेल्टर होम, जेल रोड, उमरखाडी, डोंगरी, मुंबई (केवळ मुलींकरिता ) ही १८ वर्षांखालील मुलांमुलींकरिता आश्रयस्थान( शेल्टर होम, चिल्ड्रन रूम ) देखिल आहेत.

वाहतूक, रहदारीचे व गजबलेले ठिकाण चार नळ जंक्शन मुस्लीम बहुल वस्ती, नूर बाग जंक्शन हिंदू - मुस्लीम मिश्र वस्ती, सॅन्डहर्स्ट रोड स्टेशन, हाजी अब्दुल रेहमान शाह बाबा दर्गा, एस.व्ही.पी. रोड हद्दीतील महत्त्वाची व प्राचीन दर्गा, लालचाळ, लक्ष्मण नारायण जाधव मार्ग हिंदू - मुस्लीम मिश्र वस्ती, तसेच अल्प प्रमाणात बौध्द धर्मियांचे वास्तव्य, डोंगरी मार्केट परिसर हिंदू -मुस्लीम मिश्र वस्ती परिसर इ. संवेदनशील ठिकाणे / मर्मस्थळे आहेत.