×

History


- १९१८

डाॅ. दा. भ. मार्ग पोलीस ठाणे

डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाणेची निर्मीती इंग्रजी राजवटीपासुन आहे. इंग्रजी राजवटीमध्ये या पोलीस ठाणेस लॅमीग्टंन पोलीस ठाणे या नावाने ओळखले जात होते. आताही काही जुने लोक लॅमीग्टंन रोड पोलीस ठाणे या नावानेच ओळखतात. दरम्यानचे काळात डॉ. हरी भडकमकर (दादासाहेब) यांचा जन्म कुंरदवाडा समाग शुध्द एकादशी शके १८०४, दि. ०८/०२/१८८४ रोजी पहाटे ०६.०० वा चे दरम्यान झाले. त्यांचे शिक्षण इयत्ता ४ थी ते १० वी पर्यंत एलफिन्स्टन हायस्कुल, मुंबई येथे सन १९०० पर्यंत झाले. दादांचे सन १९०३ साली पत्नी जानकीबाई ( मिरज येथे राहणाऱ्या ) यांच्यासोबत लग्न झाले. पुढे १९०४ साली दादांनी एलफिन्स्टन कॉलेज येथे बी.ए. केले. त्यानंतर सन १९०५ ते १९०९ मध्ये ग्रॅन्ट मेडीकल कॉलेजचा कोर्स घेवुन पास झाले. एल. एस. अँन्ड एस. यामध्ये पहिल्या नंबरने उत्तीर्ण व त्यानंतर एम. ए. झाले. डॉ. दादासाहेब भडकमकर हे प्रख्यात डॉक्टर नव्हते. ते संस्कृतमध्ये स्कॉलर हेाते. त्यांनी धन्वंतरीमध्ये मास्टर करून आयुर्वेद आणि न्युरो पॅथॅमधील पदवी प्राप्त केली. त्यानंतर लॅमीग्टंन रोड येथील त्रिभुवन टेरेस एम्पीरियल सिनेमा समोरील थॉमस स्टुडीओ या व इतर ठिकाणी नर्सिंग होमच्या माध्यमांतुन दादांनी गोरगरीबांची निस्वार्थ/प्रामणिकपणे सेवा केली. दादांच्या या सेवेमुळे स्वातंत्र्यानंतर स्थानिक प्रतिष्ठीत व्यक्ती राजकीय नेते, विचारवंत व इतरही मान्यवर यांनी जनसेवेचा सारासारा विचार करून लॅमीग्टंन रोड व लॅमीग्टंन रोड पोलीस ठाणे हे नाव सर्वानुमते बदली करून त्याऐवजी डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग व दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाणे, मुंबई असे नामाकरण करण्यात आले.