Welfare Activities
भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, व भारतीय साक्ष अधिनियम २०२३ या नवीन तीन कायद्यांच्या प्रसार व प्रसिद्धीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, व भारतीय साक्ष अधिनियम २०२३ या नवीन तीन कायद्यांच्या प्रसार व प्रसिद्धीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले त्याप्रमाणे वि पी रोड पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस अधिकारी व अंमलदार व मोहल्ला केमिटीवरील प्रतिष्ठित नागरिक यांची श्री जगदीश कुलकर्णी वपोनि वि पी रोड पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली माधावबाग हॉल, सीपी टॅंक सर्कल, गिरगाव,मुंबई याठिकाणी बैठक घेण्यात आली. सदरची बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक वपोनी श्री जगदीश कुलकर्णी वि प मार्ग पो ठाणे, पो नि संभाजी गुरव,पो नि गायकवाड, यांच्या उपस्थिती बैठकीमध्ये उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार व मोहल्ला कमिटी सदस्य यांना 1 जुलै २०२३पासून अमलात आलेल्या नवीन कायद्याबाबत मार्गदर्शन केले तसेच उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार व मोहल्ला कमिटी प्रतिष्ठित व्यक्ती यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने कायद्यातील तरतुदी बाबत सखोल मार्गदर्शन केले व भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, व भारतीय साक्ष अधिनियम २०२३ या नवीन तीन कायद्यां बाबत माहिती देऊन प्रसार व प्रसिद्धी करण्यात आली सदर वेळी वि प रोड पोलीस ठाणे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते
