History
- १९२३
वि.प. मार्ग पोलीस ठाणे
वि. प. मार्ग पोलीस ठाणे हे सन १९२३ साली ब्रिटीश राजवटीमध्ये उघडण्यात आले असून त्यावेळी या पोलीस ठाणेचे नांव महार बावडी पोलीस ठाणे असे होते. कालांतराने त्याचे नांव विठ्ठलभाई पटेल मार्ग पोलीस ठाणे असे बदलण्यात आले व ते आजतागायत त्याच नांवाने कार्यरत आहे. सदर पोलीस ठाणेचे क्षेत्रफळ कमी असुन ८.६० चौरस किलोमीटर इतके आहे. अनेक प्रकारचे लोक या ठिकाणी वावरत असतात. सदरचे पोलीस ठाणे हे विठ्ठलभाई पटेल मार्गावर भुलेश्वर ते प्रार्थना समाज जाणारे मार्गाचे मध्यावर असून, सध्या पोलीस ठाणे तळमजला व १ ला माळा अशा विभागणीमध्ये इमारत अस्तित्वात आहे. त्यांचे लगत पुढे अधिकारी निवासस्थान तसेच बाजूस पोलीस कर्मचारी वसाहत असून, पोलीस ठाणेचे समोर विठ्ठलभाई पटेल मार्ग हा मुख्य रस्ता व त्यापुढे अंब्रोली चर्च हे चर्च आहे.
सदरचे पोलीस ठाणे हे ब्रिटीश राजवटीमध्ये उघडण्यात आलेले असुन, दक्षिण मुंबईतील महत्वाचे पोलीस ठाणे असुन, सदर पोलीस ठाणेचे हद्दीत मधील गिरगांव हे उच्च शिक्षित, व सुधारणावादी लोकसंख्या असलेला भाग आहे. तसेच भुलेश्वर परिसरास प्राचीन परंपरा असुन त्या ठिकाणी भाजीपाला/फुलमार्केट परिसर आहे. तसेच सदर परिसरात इमिटेशन ज्वेलरीची मोठी दुकाने तसेच गोडावून असुन गुजराती/मारवाडी लोकसंख्या असलेला भाग आहे. तसेच कुंभारवाडा हा हिंदू बहुल लोकसंख्या असलेला भाग आहे. त्यास लागून चोरबाजार हा मुस्लीम बहुल लोकसंख्या असलेला भाग संवेदनशील सदरात मोडतो. त्याचप्रमाणे पोलीस ठाणे हद्दीत खेतवाडी परिसर असुन, खेतवाडी एकूण १४ गल्ल्यामध्ये विभागली असून, त्यापैकी १ ते १० गल्ल्या या पोलीस ठाणेचा भाग आहे. सदर भागात पूर्वीपासून महाराष्ट्रीयन लोकांचे वास्तव्य आहे. मात्र आता हळुहळु ते कमी होऊन येथे गुजराती / मारवाडी समाज वाढत आहे. तसेच या पोलीस ठाणे हद्दीत बहुतेक लोकवस्ती ही उच्च शिक्षित आहे
पोलीस ठाणे स्थापना - सन १९२३