Initiatives
मुंबई पोलीस सायबर शील्ड
मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. विवेक फणसळकर यांचे संकल्पनेतून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी 'मुंबई पोलीस शील्ड' हा उपक्रम दि. ०७ फेब्रु., २०२४ रोजी सुरू करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करणे तसेच सायबर गुन्ह्यांविरोधातील उपाययोजना बळकट करण्यासाठी १,००० अतिरिक्त पोलीस अंमलदार पोलीस ठाणे स्तरावर प्रशिक्षित करणे आणि नागरिकांना सायबर गुन्ह्यांबाबत जागृत करून सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करणे/आळा घालणे हा आहे.
१९३० सायबर हेल्पलाईन, गुन्हे शाखा, मुंबई
सायबर गुन्हेजागृती बरोबरच बृहन्मुंबई शहरातील नागरिकांना सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदवणे सोपे व्हावे तसेच सायबर फसवणुक झालेल्या प्रकरणांमध्ये नागरिकांना तात्काळ प्रतिसाद देऊन फसवणुक झालेली रक्कम गोठण्याकरिता गृहमंत्रालयामार्फत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) शी संलग्न १९३० सायबर हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे.





























