×

History


- १९८२

ताडदेव पोलीस ठाणे

ताडदेव पोलीस ठाण्याची स्थापना सन १९८२ साली करण्यात आली. त्यावेळचे गावदेवी पोलीस ठाणे व आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील काही भाग कमी करण्यात आला व त्यातून ताडदेव पोलीस ठाण्याची निर्मिती झाली.

या पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन बीट चौकी आहेत आणि एनएससीआय क्लब व रेस कोर्स ही महत्त्वाच्या ठिकाणे आहेत आणि हाजी अली दरगाह हे ऐतिहासिक धार्मिक स्थान आहे. परिसर लोकसंख्या ४.२ लाख आहे.

पोलीस ठाण्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये इंपीरियल ट्विन टॉवर, महिंद्रा टॉवर, वेलिंग्टन हाइट्स यांसारख्या उंच इमारती, तसेच तुळशीवाडी, आंबेडकर नगर आणि व्हीपी नगर हे झोपडपट्टी परिसर आहेत.