इतिहास
- १९६७
शिवडी पोलीस ठाणे
शिवडी पोलीस ठाण्याची स्थापना ०६ जुलै १९६७ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - शिवडी पोलिस स्टेशन, रे रोड, दारुखाना, शिवडी, मुंबई-४०००१० येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे २.५ लाख लोकसंख्या १.५ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. हे पोलीस ठाणे २ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - दारुखाना बिट चौकी, गाडीअड्डा बिट चौकी.
मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आयओसी, बीपीसीएल, एचपीसीएल, माझगाव डॉक, बिजली भवन चा समावेश होतो.
प्रवासासाठी रे रोड रेल्वे स्टेशन आणि शिवडी रेल्वे स्टेशन हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. शिवडी पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
दूरध्वनी क्रमांक - ०२२-२३७१६१३९, २३७५८१६३
मोबाईल क्रमांक - ८९७६९४७२१७