×

इतिहास


- १९४०

सांताक्रूझ पोलीस ठाणे

सांताक्रूझ पोलीस ठाण्याची स्थापना १९४० रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - जुहू गार्डन समोर, लिंकिंग रोड, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई-४०००५४ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ०५ लाख लोकसंख्या ही १०.२३ चौ.किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. सांताक्रूझ पोलीस ठाणे ०४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - सांताक्रूझ रेल्वे स्थानक चैकी, गझधरबांध पोलीस चौकी, विलेपार्ले रेल्वे स्टेशन पोलीस चौकी आणि सांताक्रूझ चौपाटी पोलीस चौकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बी.एस.एन.एल कार्यालय, पवन हंस जुनी विमान धावपट्टी, भारतीय डाक पोस्ट ऑफिस, तलाठी कार्यालय, बिनतारी संदेश कार्यालय, जी.एस.टी कार्यालय, जुहू चोपाट्टी आणि जेडब्ल्यू मॅरियट हॉटेल असे अनेक महत्त्वाची ठिकाणे, हॉटेल्स आणि संस्थांचा समावेश होतो. याशिवाय पोलीस दवाखाना - डिस्पेन्सरी हे प्रमुख सरकारी रुग्णालय तर नानावटी हाॅस्पीटल, सूर्या हाॅस्पीटल आणि मंगल रुग्णालय इत्यादी खासगी रुग्णालये येथे उपलब्ध आहेत. प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये विठ्ठलदास मंदिर, गुरुद्वारा धन पोथोहर नगर आणि आधारेश्वर महादेव हनुमान मंदिर यांचा समावेश आहे.

सांताक्रूझ (प.), विलेपार्ले (प.) रेल्वे स्थानके, सांताक्रूझ आणि जुहू चौपाटी बस डेपो हे प्रवाशांसाठी मुख्य दळणवळण केंद्र आहेत. सांताक्रूझ पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२६४९३१३९/२६४९२९७२

मोबाईल क्रमांक – ८९७६९५१९८१