History
- १९८६
नेहरुनगर पोलीस ठाणे
नेहरु नगर पोलीस ठाण्याची स्थापना १९८६ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - नेहरु नगर पोलीस वसाहत, मुंबई--४०००२४ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ०५ लाख लोकसंख्या ही ५.२५ चौ.किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. नेहरु नगर पोलीस ठाणे ०३ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - कुर्ला रेल्वे स्थानक मार्ग पोलीस चौकी, शिवश्रुष्टी पोलीस चौकी आणि सहकारनगर पोलीस चौकी.
नेहरु नगर पोलिस ठाणेच्या हद्दीत आर्यन हॉस्पिटल आणि व्ही-केअर हॉस्पिटल ही प्रमुख खाजगी रुग्णालये आहेत.
प्रवासासाठी कुर्ला रेल्वे स्थानक (पूर्व), टिळक नगर रेल्वे स्थानक, कुर्ला आणि शिवश्रुष्टी बस डेपो हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. नेहरु नगर पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
दूरध्वनी क्रमांक - ०२२-२५२४४७६७/२५२४४१०१/२५२२४२९१/२५२९०९४६/२५२२४६४७
मोबाईल क्रमांक - ८९७६९४७९५४