×

History


- २००१

नवघर पोलीस ठाणे,

नवघर पोलीस ठाणे हे सन २००१ सालापासुन म्हाडा कॉलनी, म्हाडा बस डेपो शेजारी, मुलुंड पुर्व, मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे.

नवघर पोलीस ठाणे, मुंबई हे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयातील मुलुंड पोलीस ठाणेची एक बीट होती. मुलुंड पोलीस ठाणे हे मुलुंड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असुन, नवघर पोलीस ठाणे हे मुलुंड रेल्वे स्थानकाच्या पुर्व बाजुस आहे. लोकवस्ती वाढल्याने सन २००१ साली मुलुंड पोलीस ठाणेतुन मुलुंड रेल्वे स्थानकाच्या पुर्वेचा भाग वेगळा करुन नवघर पोलीस ठाणेची निर्मिती करण्यात आलेली आहे.