History
- २००१
कुरार पोलीस ठाणे
कुरार पोलीस ठाण्याची स्थापना २००१ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - कुरार पोलीस स्टेशन, शांताराम तलावाजवळ, मालाड पूर्व, मुंबई येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ७,३५,००० लोकसंख्या ४६०.०३ चौ. मीटर क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. हे पोलीस ठाणे ४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - रामलीला मैदान पोलीस चौकी, लक्ष्मण नगर पोलीस चौकी, तानाजी नगर पोलीस चौकी, क्रांती नगर पोलीस चौकी.
मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मालाड टेकडी जलाशय, दिंडोशी सत्र न्यायालय, दिंडोशी बस डेपो, अदानी इलेक्ट्रिक सिटी ऑफिस चा समावेश होतो. या परिसरात रेहात हॉस्पिटल, डी.एन.ए. रुग्णालय, माऊली रुग्णालय, आशा रुग्णालय, आस्था रुग्णालय सारखी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.
प्रवासासाठी पुष्पापार्क बस स्टॉप, शांताराम तलाव बस स्टॉप, पठाणवाडी बस स्टॉप हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. कुरार पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
मोबाईल क्रमांक - ८९७६९५२४२७