×

History


-

कस्तुरबा मार्ग पोलीस

कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे, बोरीवली, पुर्व, मुंबई या इमारतीची जागा (भुखंड) बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या मालकीची आहे. सदर जागेचा (भुखंड) सर्व्हे नं. ५३, हिस्सा नं. १, सिटी सर्व्हे नं. १५९, मंजूर नगररचना योजना - २ बोरीवली (अंतिम) प्रमाणे अंतिम भूखंड क्र. ०३, मौजे - व्हिलेज कान्हेरी, कस्तुरबा मेन रोड, बोरीवली (पुर्व), मुंबई असा सदर जागेचे क्षेत्रफळ ८६३.७ चौ.मी. असा आहे.

मा. आयुक्त, महानगर पालिका, बृहन्मुंबई यांचे अ.शा.प.क्र. एमजीसी/सी/८७४०/८६, दिनांक ०५/०६/१९८६ अन्वये सदरची जागा सन १९८६ पासुन कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणेस (पोलीस विभागास) जागा भाडेतत्वावर उपलब्ध ( हस्तांतरीत) करून देण्यात आली आहे.

कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या जागेचे क्षेत्रफळ ११०७ चौ.मी. असुन नमुद बैठया चाळीचे बांधकाम हे सन १९८६ पुर्वीचे फार जुने बांधकाम आहे. सदरच्या जागेवर बैठया चाळीमध्ये १४ खोल्या आहेत. सदर ठिकाणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे नित्याक्रमाने कामकाज आजपावेतो चालू आहे.