×

History


- १९६२

घाटकोपर पोलीस ठाणे

बृहन्मुंबई उपनगरातील घाटकोपर पोलीस ठाणे हे सन १९६२ मध्ये घाटकोपर रेल्वे स्टेशन (प) येथील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत सुरू झाले. तेथुन लालबहादुर शास्त्री मार्ग (आग्रा रोड), घाटकोपर (प), मुंबई येथील सध्या अस्तित्वात असलेल्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात स्थलांतरीत करण्यात आले. दरम्यान चिरागउद्दीन या इसमाने भारतातून पाकीस्तानात स्थलांतर केल्याने त्याच्या मालकीचे गुलीस्तान कंपाऊंड, लालबहादुर शास्त्री मार्गावरील साडेसहा एकर जमीनीचा ताबा राज्य शासनाला मिळाला . त्यानंतर राज्य शासनाने सदर जागेवरील एक मजली दोन इमारतीचा ताबा पोलीस खात्यास सुपूर्द केल्याने गुन्हे शाखेच्या कार्यालयातील घाटकोपर पोलीस ठाणे हे चिरागनगर या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. तेव्हापासून घाटकोपर पोलीस ठाण्यास स्थानिक रहिवाशी चिरागनगर पोलीस ठाणे या नावाने संबोधतात.

घाटकोपर पोलीस ठाणे हददीतील बराचसा भाग डोंगराळ टेकडयांचा असून जास्तीत जास्त लोक मिश्र जाती-धर्माचे, मध्यम वर्गीय तसेच कामगार क्षेत्रातील असून जास्तीत जास्त झोपडपटटयांमधुन वास्तव्यास आहेत. त्याचप्रमाणे मध्यवर्ती भागात गुजराती समाजाची वस्ती, नेव्हल स्टोअर्स डेपो तसेच कुर्ला इंडस्ट्रीयल इस्टेट हा औद्योगिक पट्टा आहे.