×

History


-

आग्रीपाडा पोलीस ठाणे

सदरच्या फेरबदलामुळे आग्रीपाडा पोलीस ठाणे हे दक्षिण प्रादेशिक विभाग व परिमंडळ -२ यांचे कार्यक्षेत्रातून मध्य प्रादेशिक विभाग व परिमंडळ-३ यांचे कार्यक्षेत्रात दिनांक ०१/०९/२००१ पासून कार्यान्वीत करण्यात आले आहे. त्यावेळी मध्य प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त मा. श्री. आर.डी. राठोड, परिमंडळ-३ चे पोलीस उप आयुक्त मा. श्री. आर.डी. शिंदे तसेच नव्याने निर्माण केलेल्या आग्रीपाडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मा. श्री. आर.एल.पवार व आग्रीपाडा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश पाटील हे कार्यरत होते.

आग्रीपाडा पोलीस ठाणेची इमारत सन १९२७ मधे बांधण्यात आली आहे. आग्रीपाडा पोलीस ठाणे हे बृहन्मंबई पोलीस आयुक्तालातील अति संवेदनशिल व महत्वाचे पोलीस ठाणे म्हणुन गणले जाते. आग्रीपाडा पोलीस ठाणे हे दिनांक ३०/०८/२००१ पर्यत मुंबई पोलीस आयुक्तालयाचे दक्षिण प्रादेशिक विभागातील परिमंडळ-२ चे पोलीस उप आयुक्त यांचे अखत्यारीत कार्यरत होते. त्यावेळी आग्रीपाडा पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपाडा विभाग अंतर्गत होते. त्यावेळी दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त मा. श्री. जावेद अहमद, परिमंडळ-२ चे पोलीस उप आयुक्त मा. श्री. रजनिश सेठ व नागपाडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून मा. श्री. भीमराव खांबे यांच्याकडे कार्यभार होता. बृहन्मंबई पोलीस दलातील परिक्षेत्राचा व कार्यरचनेचा वाढत चाललेला अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी मा. पोलीस आयुक्त, बृहन्मंबई कार्यक्षेत्राअंतर्गत कायदा व सुव्यवस्था अधिक मजबुत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अपर पोलीस आयुक्त आणि पोलीस उप आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रात मोठया प्रमाणात फेरबदल केले.

पोलीस ठाणे स्थापना - सन १९२७