×

History


- १९५२

आरे पोलीस ठाणे -

आरे पोलीस ठाणे ची स्थापना सन १९५२ मध्ये झाली आहे. प्रथम गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या बिट चौकी हद्दीतील वाढती लोकसंख्या, गुन्हेगारीचा आढावा घेवून सदर बिट चौकीचे रूपांतर आरे पोलीस ठाणे असे करण्यात आले व त्या प्रमाणे पेालीस ठाण्याच्या मनुष्यबळात वाढ करण्यात आली. पोलीस ठाणेची सध्याची जागा ही आरे प्रशासनाची असून, पोलीस ठाणे इमारत भाडे तत्वावर आहे.

आरे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारा परिसर हा आरे प्रशासनाच्या अधिकार क्षेत्रातील असून, पोलीस ठाणे परिक्षेत्रातील आरे वसाहतीत ३२ युनिट, २८ आदिवासी पाडे तसेच मॉडर्न बेकरी, गौतम नगर, हिल क्वाटर्स, आदर्शनगर, सर्वोदय नगर अशी झोपडपट्टी, फिल्मसिटी, रॉयलपाम इस्टेट, सीप्झ असे औद्योगिक क्षेत्र, फोर्स वन प्रशिक्षण केंद्र, वायरलेस रिसिव्हर सेन्टंर, मेट्रो ३ कारशेड प्रकल्प असा एकुण ३७२० एकर परिसराचा भाग आहे.