×

History


- १९०६

कुलाबा पोलीस ठाणे

कुलाबा पोलीस ठाण्याची स्थापना १९०६ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - कुलाबा पोलिस स्टेशन, इलेक्ट्रिक हाऊस जवळ, एस.बी.एस. रोड, कुलाबा, मुंबई - ४००००५ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे १,००,००० लोकसंख्या २.५ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. हे पोलीस ठाणे ३ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - गेट वे ऑफ इंडिया बिट चौकी, कुलाबावाडी बिट चौकी, ससून डॉक बिट चौकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात नेव्हल डॉकयार्ड, पोलीस महासंचालक कार्यालय, जहांगीर आर्ट गॅलरी, गेट वे ऑफ इंडिया चा समावेश होतो. या परिसरात पोफळे नर्सिंग होम, द अपोलो क्लिनिक, केकी मेहता आय क्लिनिक अशी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.

प्रवासासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्टेशन, चर्चगेट रेल्वे स्टेशन, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौक बस स्थानक, स्टँड सिनेमा बस स्टॉप आणि कुलाबा पोस्ट ऑफिस बस स्टॉप हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. कुलाबा पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२२८५२८८५, २२०४३७०२, २२८५६८१७

मोबाईल क्रमांक - ८९७६९४७१६३