×

Good Work


टॅक्सी ने प्रवास करत असताना आपली बॅग टॅक्सी मध्येच विसरल्याची तक्रार एका महिलेने अँटॉप हिल पोलीस ठाण्यात दाखल केली. सदर महिलेकडे विचारपूस केले असता त्या सीआयएसएफ मध्ये पोलीस कॉन्स्टेबल असून काल रात्री आठ वाजता एअरपोर्टवरून त्या राहत असलेल्या ठिकाणी सेक्टर 7 सीजीएस कॉलनी, अँटॉप हिल येथे टॅक्सी ने आल्या परंतु त्यांची बॅग टॅक्सी मध्येच विसरली, त्यामध्ये महत्त्वाचे कागदपत्रे, पोलीस ID card व रोख रक्कम असल्याचे कळताच घटनेचे गांभीर्य ओळखून सायबर पथकाने संबंधित टॅक्सी चालकाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले परंतु अंधार असल्याकारणाने टॅक्सी नंबर दिसत नव्हता. तक्रारदार यांनी सदर टॅक्सी चालकास ऑनलाईन पेमेंट केल्याचे सांगितल्याने तात्काळ बेनिफिशियरी बँक ची माहिती प्राप्त करून नोडल ऑफिसर यांच्याशी संपर्क करून संबंधित टॅक्सी चालकाचा मोबाईल नंबर प्राप्त करून तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन सदरची बॅग मूळ मालकाला परत करण्यात आली.

PDF view

अर्जदार नामे लक्ष्मीकांत पाटील यांना अनोळखी इसमाने एचडीएफसी ऑर्गो इन्शुरन्स कंपनीचे भागीदार असल्याचे भासवून त्यांचे क्रेडिट कार्डवर 59000/- सत्याची फसवणूक केली. सदरची घटना डिसेंबर २०२४ मध्ये घडली. तक्रारदार यांनी स्वतः एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी आर्गो इन्शुरन्स कंपनीकडे मदत केली नाही. आपण अखेर त्यांनी 10/03/2025 रोजी अँटॉप हिल पोलिस तक्रार केली. सायबर गावाने एचडीएफसी बँक आणि एचडीसी ऑर्गो इन्शुरन्स कंपनीशी हाऊरवीज बोर्ड पाठपुरावा तक्रारदार पैसे परत मिळवून दिले.

PDF view