History
- २००२
वडाळा ट्रक ट्रर्मिनल पोलीस ठाणे
वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याची स्थापना ०२/१२/२००२ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - वडाळा टी. टी. पोलीस ठाणे, एम.एम.आर.डी. इमारत, आर.टी.ओ. च्या बाजूला, वडाळा, मुंबई ३७ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ३,१५,००० लोकसंख्या २.५ चौ. किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. हे पोलीस ठाणे ४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - संगमनगर बिट चौकी, कोकारी आगर बिट चौकी, प्रतिक्षानगर बिट चौकी, भक्तीपार्क चौकी.
मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मोनोरेल स्टेशन वडाळा पूर्व, टाटा पॉवर हाऊस, प्रतिक्षानगर डेपो, आणिक आगर डेपो, महानगर गॅस, मिराज सिनेमा हॉल, रावळी कॅम्प जलाशय चा समावेश होतो. या परिसरात के. जे. सोमैया रुग्णालयासारखी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.
प्रवासासाठी जीटीबी रेल्वे स्टेशन, आणिक आगार बस डेपो आणि प्रतिक्षा नगर बस डेपो हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. वडाळा टी. टी पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.
मोबाईल क्रमांक - ८९७६९४७२३२