×

इतिहास


- १९७६

ट्रॉम्बे पोलीस ठाणे

ट्रॉम्बे पोलीस ठाण्याची स्थापना २६/०१/१९७६ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - ट्रॉम्बे पोलिस स्टेशन, चित्ता कॅप, एम.जी.आर. रोड, ट्रॉम्बे, मुंबई येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ८,००,००० लोकसंख्या १९ चौरस किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. हे पोलीस ठाणे ४ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - चित्ता कॅम्प बिट चौकी, छत्रपती शिवाजी महाराज चौक बिट चौकी, महात्मा फुले नगर बिट चौकी, महाराष्ट्र नगर बिट चौकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मेट्रो कार शेड, ज्योतिबा मंदिर, खंडोबा मंदिर, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, ट्रॉम्बे टर्मिनल, गणेश कीर्ती मंदिर, जनता हॉटेल, नेव्हल आरमामेन्ट डेपो, ट्रॉम्बे जे.टी., पाणी पुरवठा केंद्र, सेलर्स ब्युरो, भाभा अनुसंशोधन केंद्र चा समावेश होतो. महानगरपालिका प्रसूतीगृह आणि बीएआरसी रुग्णालय हे प्रमुख सार्वजनिक रुग्णालय म्हणून काम करत असले तरी, परिसरात आर.एन. रुग्णालय, ज्युपिटर रुग्णालय, हयात रुग्णालय अशी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.

प्रवासासाठी मानखुर्द रेल्वे स्टेशन, ट्रॉम्बे टर्मिनल बस डेपो, अनुशक्तीनगर बस डेपो हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. ट्रॉम्बे पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२५४८०१६६, २५५६७१९०, २५४८१८७६

मोबाईल क्रमांक - ८९७६९४७९५६