×

History


- १९९०

ओशिवरा पोलीस ठाणे

ओशिवरा पोलीस ठाणेची स्थापना दि. २७/०३/१९९० रोजी झाली आहे. सदर कालावधीमध्ये डी.एन. नगर पोलीस ठाणेस ५०० चौ. फुटच्या दोन खोल्यांच्या जागेत ओशिवरा पोलीस ठाणे सुरु करण्यात आले होते. शासकीय आदेश क्र. ०१९०/पोल-७, दि. १०/०२/१९९१ प्रमाणे सर्व्हे क्र. ४१ या ठिकाणी २२०० चौ. फुटाच्या मौजे ओशिवरा गावठाण या जागेत ओशिवरा पोलीस ठाणेस जागा देण्यात आली.

दि. २७/०१/१९९४ रोजी मौजे ओशिवरा गावठाण या ठिकाणी ओशिवरा पोलीस ठाणेचे उदघाटन मा. सह पोलीस आयुक्त, श्री. ओ.पी.बाली (भापोसे) यांच्या हस्ते करण्यात आले. ओशिवरा पोलीस ठाण्याचे पहिले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पुरुषोत्तम मुळे (दि. २१/०९/१९९८ ते दि. ०५/०९/२००१) हे होते.